केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना राज्यसभेची तीन वेळा संधी दिल्यानंतर यंदा भाजपाने त्यांना थेट लोकसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. वर्षांनुवर्षे राज्यसभेचं सदस्यत्व भूषविणाऱ्या सदस्यांचा लोकांशी थेट संपर्क येत नाही. यामुळेच अशा नेत्यांसाठी लोकसभा लढवणं हे मोठं आव्हान असतं. पीयूष गोयल यांचं मूळ वास्तव्य दक्षिण मुंबईत. असं असतानाही भाजपाकडून पीयूष गोयल यांच्यासाठी उत्तर मुंबई मतदारसंघाची निवड का करण्यात आली हे जाणून घेऊयात.