महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये भिवंडीच्या जागेचा तिढा अखेर सुटला असून ही जागा मिळताच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांची उमेदवारी जाहीर केली. सुरेश म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची पुण्यातील शिवाजीनगर येथील निवासस्थानी भेट घेतली. त्यावेळी दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. त्यानंतर सुरेश म्हात्रे यांनी माध्यमांशी संवाद साधला.