“आमदार बच्चू कडू हे आमचे मोठे बंधू आहेत. पण, तोडीबाज म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या मालमत्तेची माहिती आपल्याकडे आहे. त्यांनी आमच्या विरोधात राजकारण करू नये, इथे रवी राणांसोबत गाठ आहे”, असा इशारा आमदार रवी राणा यांनी जाहीर सभेत बोलताना दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावर बच्चू कडू यांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे.