लोकसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्याने राजकीय नेत्यांच्या विरोधकांवरच्या टीका वाढलेल्या दिसून येत आहे. “मोदी आणि शाहांनी अघोरी जादू केली. ज्या धनुष्यबाणावर बाळासाहेबांची श्रद्धा होती, तो धनुष्यबाण महाराष्ट्रातून गायब करण्याचे अघोरी कृत्य मोदी आणि शाहांनी केलं आहे. ज्यांनी हा धनुष्यबाण घेतला, त्यांना हा धनुष्यबाण वाचवता आला नाही. त्यांनी धनुष्यबाण चोरला त्यांनी शिवसेना चोरली आणि तो चोरीचा माल भाजपाने चोरला” अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर केली आहे.