यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघाच्या सलग पाच वेळा शिवसेनेच्या खासदार भावना गवळी या राहिल्या आहेत.मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भावना गवळी यांना तिकीट नाकारून,पक्षाने जिल्हा परिषद आणि विधानसभेला पराभूत झालेल्या राजश्री पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात असून भावना गवळी यांना तिकीट नाकारल्याची राज्यभरात एकच चर्चा सुरू आहे. त्याचदरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी आज राज्यातील अनेक घडामोडींबाबत भूमिका मांडली.