हातकणंगलेमधील लढत प्रामुख्याने चौरंगी होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. शिंदे सेनेचे खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी, ठाकरे सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर आणि वंचित बहुजन आघाडीचे कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांच्यात रंगणार आहे.