महाराष्ट्रात महायुतीत काही जागांवर तिन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाल्याची चर्चा आहे. यामध्ये कल्याण लोकसभेचाही समावेश आहे. मुख्यमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांचे पूत्र श्रीकांत शिंदे हे कल्याण लोकसभेचे खासदार आहेत. परंतु, त्यांना कल्याणमध्ये भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून विरोध होत आहे. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री अद्याप त्यांच्या मुलाची उमेदवारीदेखील जाहीर करू शकले नाहीत. त्यावरून टाकरे गटतील नेत्यांनी टोला लगावला होता. यासंदर्भात शिंदे गटातील नेते आणि माजी आमदार रामदास कदम यांनी उत्तर देताना श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीवरून भाष्य केलं आहे.