कल्याण लोकसभा मतदारसंघातून खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उमेदवारीला भाजपाचा विरोध असल्याची चर्चा होती. त्यामुळे कल्याणमधील उमेदवारीवरून संभ्रम निर्माण झाला होता. यावर अखेर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदे उमेदवार असतील हेही त्यांनी स्पष्ट केलं. नागपूरमध्ये ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. यावेळी इंडिया आघाडीवरही त्यांनी टीकास्त्र डागलं.