घड्याळावर लढणाऱ्या लोकांची संख्या किती आहे ते दाखवा. इतक्या दिल्ली वाऱ्या केल्या आणि केवळ पाच जागा मिळाल्या, त्याही दोन घरात आणि दोन उमेदवार आयात करावे लागले, असा टोला राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) खासदार अमोल कोल्हे यांनी लगावला आहे. अमोल कोल्हे हे हडपसर विधानसभा मतदारसंघात काल (६ एप्रिल) प्रचारार्थ आले होते. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला