रत्नागिरी-सिंधुदुर्गात मतदारसंघात शिवसेना (शिंदे गट) की भाजपा यांच्यापैकी कोणाचा उमेदवार जाहीर होणार याबाबतचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. त्यापूर्वीच केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी मतदारसंघात सभा घेण्यास सुरुवातही केली आहे. मात्र उमेदवारीचं घोडं नेमकं अडलंय कुठे यासंदर्भात नारायण राणे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तर येत्या दोन दिवसांत उमेदवारांची नावं जाहीर होतील, असंही राणे म्हणाले.