येणाऱ्या पंधरा दिवसांमध्ये माझा पक्षप्रवेश करावा अशी मी विनंती केली आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या भाजपा प्रवेशाविषयी चर्चा सुरू होती. अखेर खडसे यांनी स्वतःच याबाबत भूमिका स्पष्ट केली. तसंच आपल्या पक्षप्रवेशाविषयी देखील माहिती दिली आहे. दरम्यान, भाजपामध्ये नाराज असलेले खडसे यांनी २०२० मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. तसंच राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर ते शरद पवार गटाबरोबरच राहिले होते.