माझे विरोधक आणि इतर काही लोक म्हणत आहेत की माझं वय ८४ झालं आहे. माझं वय काढू नका, तुम्ही काय बघितलंय मला? मी थांबणार नाही. ज्या लोकांनी साथ दिली त्यांना असं सोडणार नाही, असं म्हणत शरद पवारांनी त्यांच्या वयावरून बोलणाऱ्यांना टोला गलावला आहे. उंडवडी कडेपठार येथील कार्यकर्त्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला.