जळगावमधील रावेर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार निश्चितीसाठी पुण्यातील मोदीबागेत सोमवारी खलबते रंगली. पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासह भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी, रवींद्र पाटील, श्रीराम पाटील यांनी शरद पवार यांची मोदीबागेत भेट घेतली. मात्र रोहिणी खडसे यांनी रावेरमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याचे जाहीर केले. जयंत पाटील यांनीही इच्छुकांबरोबर चर्चा झाली असून, मंगळवारी निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगितले.