लोकसभा निवडणूक आता जवळ येऊन ठेपली आहे आणि प्रचारालासुद्धा सुरवात झाली आहे. कॉंग्रेसमधून भाजपामध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेसच्या राज्यातील नेतृत्वावर टीका केली आहे. “राज्यातील कॉंग्रेसचं नेतृत्व खुप कमजोर झालंय. हक्काच्या असणाऱ्या सांगली आणी भिवंडीच्या जागा त्यांना सोडाव्या लागतात यावरून कॉंग्रेसचं नेतृत्व कमजोर झाल्याचं सिध्द होतंय” असं चव्हाण म्हणाले आहेत.