गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या जागेसंदर्भात महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचं बोललं जात होतं. मात्र, आज मुंबईच्या शिवालयमध्ये झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये मविआत कोणतेही मतभेद नसल्याचं तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट केलं. तसेच, यावेळी तिन्ही पक्षांना कोणत्या जागा मिळाल्या याची यादीही जाहीर करण्यात आली.