महायुतीच्या बारामतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामतीत आहेत. बारामतीत त्यांच्या प्रचारसंभांचा धडाका सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना त्यांनी केलेलं विधान सध्या चर्चेत आहे. १९९१ ला मुलाला म्हणजेच मला निवडून दिलं, नंतर वडिलांना म्हणजे साहेबांना मग लेकीला तीन वेळा निवडून दिलं, आता सुनेला निवडून द्या असं आवाहन त्यांनी केलं आहे.