घराणेशाहीच्या मुद्द्य़ावरून भाजपाकडून अनेकदा विरोधकांवर टीका केली जाते. याबाबत भाजपानं सातत्यानं काँग्रेससह समाजवादी पक्ष, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक अशा प्रादेशिक पक्षांना लक्ष्य केलंय. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे यंदाच्या निवडणुकीत भाजपानं स्वत:च मोठा राजकीय वारसा लाभलेल्या १० राजघराण्यांतील सदस्यांना लोकसभेची उमेदवारी दिलीय. हे उमेदवार नेमके कोण आहेत, पाहुयात…