भाजपच्या दबावामुळे भावना गवळी, हेमंत गोडसे यासह अन्य विद्यमान खासदाराचे तिकीट नाकारण्यात आले आहे, अशी सध्या अशी चर्चा सुरू आहे. याबद्दलच्या प्रश्नावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, “सकाळच्या व्याख्यानाचा परिणाम एवढ्या मोठ्या प्रमाणावर करून घेऊ नका” अशा शब्दात अप्रत्यक्षपणे ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांना टोला लगावत त्या पुढे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व परिस्थिती पाहून हे निर्णय घेतले आहेत. नाशिकच्या जागेचा सतत उल्लेख केला जात आहे.त्याबाबत मी एक सांगू इच्छिते की, नाशिकच्या जागेचा उमेदवार अद्यापपर्यंत जाहीर झालेला नाही”