महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले वाड्यात येऊन पुष्पहार अर्पण करून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिवादन केलं. तर या ठिकाणी १० हजार किलो मिसळ तयार करण्यात आली असून अभिवादन करण्यास येणार्या नागरिकांना ती देण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मिसळ करण्यात आल्याने त्याची माहिती अजित पवार यांनी शेफ विष्णु मनोहर यांच्या कडून घेतील. त्यानंतर अजित पवार आणि चंद्रकांत पाटील यांनी मिसळचा आस्वाद देखील घेतला.