सांगली मतदारसंघावर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने दावा दाखल केला असला तरी काँग्रेसने आणि मविआने पुन्हा एकदा या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी विश्वजीत कदम यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना केली होती. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या १० वर्षांपासून सांगलीत भाजपाचे खासदार निवडून येत आहे. त्यांचा सामना करायचा असेल, तर ठाकरे गटाचा उमेदवार निवडून येणे गरजेचं आहे, असंही राऊत म्हणाले.