पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाच्या मुद्द्यावर मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असला तरी त्याचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फायदा किती आणि शिवसेना ठाकरे गटाचे किती नुकसान होऊ शकते याबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला २.२५ टक्के मते मिळाली होती, आता या निवडणुकीत मनसेच्या पाठिंब्याने महायुतीला किती फायदा होईल? चला तर जाणून घेऊयात..