लोकसभा निवडणुकीमध्ये कोल्हापुरात मविआकडून शाहू महाराज तर महायुतीकडून शिंदे गटाच्या तिकीटावर संजय मंडलिक लढणार आहेत. दरम्यान, महायुतीच्या प्रचारसभेत संजय मंडलिक यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. “आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार नाहीत” असं वक्तव्य संजय मंडलिक यांनी केलं होतं. यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.