भाजपाचे एकेकाळचे खंदे नेतृत्व आणि माजी मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांचे २०१९ साली तिकीट कापल्यानंतर त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीने त्यांना विधानपरिषदेवर संधी देऊन सन्मानितही केले. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर एकनाथ खडसे स्वगृही परतत आहेत. यावर शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.