लोकशाही हीच आधुनिक भारताची खरी ओळख आहे. भारतात यंदा १८ वी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. याची पाळंमुळं ७२ वर्षांपूर्वी झालेल्या पहिल्या मतदानादरम्यान मांडलेल्या काही मूलभूत प्रजासत्ताक मूल्यांमध्ये आढळतात. त्याच मूल्यांना अनुसरून देशाची निवडणूक प्रणाली कालांतराने विकसित झाली आहे. यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने या इतिहासाचा थोडक्यात घेतलेला हा आढावा.