कोल्हापुरातल्या न्यू कॉलेजमधील शिक्षक, प्राध्यापकांना निवडणूक प्रचारात गुंतवल्याचा गंभीर आरोप महायुतीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. संस्थेतील प्राध्यापकांकडून विशिष्ट फॉर्म भरून घेतले असून यामध्ये मतदारांची संख्या, त्यांचे नाव, पत्ता आणि मोबाईल अशी सर्व माहिती भरून घेतल्याचं प्रकरण सामोरं आल आहे. यासंदर्भात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्राचार्य आणि चेअरमन यांना या संदर्भात जाब विचारला असून भरून घेण्यात आलेले फॉर्म कार्यकर्त्यांच्या ताब्यात दिले आहेत.