देशात लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यापासून सर्व पक्ष तयारी करीत आहेत. तसेच निवडणूक आयोगदेखील तयारीला लागला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी देशभरात निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. १६ एप्रिल ते १ जून यादरम्यान सात टप्प्यांमध्ये ही मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने व्होट फ्रॉम होम म्हणजेच घरबसल्या मतदान करण्याचा पर्यायही आता उपलब्ध करून दिला आहे. पण या सुविधेसाठी नेमकं कोण पात्र ठरेल? याची प्रक्रिया नेमकी काय आहे? जाणून घेऊ या.