लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरु आहे. निवडणुकीच्या प्रचारात राजकीय नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना पाहायला मिळत आहेत. इंडिया आघाडीकडून भाजपावर टीका करताना अनेकदा संविधान धोक्यात आल्याची टीका करण्यात येत आहे. या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये आयोजित रॅलीला संबोधित करताना काँग्रेसवर टीका करत प्रत्युत्तर दिले आहे. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी आले तरी संविधान संपवू शकत नाहीत”, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.