राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मागील सात महिन्यापासून दररोज आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे. या सर्व घडामोडी दरम्यान लोकसभा निवडणुकीला अगदी काहीच दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. दरम्यान “मलिदा गँगमधील काही लोक कार्यकर्त्यांना धमकी देण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांची असलेली पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांचा वापर केला जात आहे. गुंडांच्या माध्यमातून बारामती लोकसभेत धमकावण्याचे काम सुरू आहे” असा आरोप रोहित पवार यांनी अजित पवारांवर केलाय.