आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघ लक्षवेधी ठरला आहे. अजित पवार गट आणि शरद पवार गट या मतदारसंघातून थेट आमने सामने आहे. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या मतदारसंघातून लढणार आहेत. मागील आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात पत्रकाराशी संवाद साधताना मूळ पवार आणि बाहेरून आलेले पवार यांच्यात फरक आहे असे विधान करीत सुनेत्रा पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला होता. त्या राजकीय वर्तुळात अनेक आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहे.शरद पवार यांच्या विधानाबाबत सुनेत्रा पवार यांना विचारले असता,त्यांनी हात जोडत उत्तर देणे टाळले