अहमदनगरमधील स्वाभिमान जनसंवाद यात्रेदरम्यान पाण्याच्या प्रश्नावर निलेश लंके यांनी विखेंना टोला लगावला असून “विखे फक्त बोलतात, मी जे बोलतो ते करतोच. आमदारकीच्या कार्यकाळात पारनेर मतदारसंघात अनेक विकासाची कामे केली त्यामुळे आगामी काळात देखील येथील प्रश्न सोडविण्याचे काम केले जाईल. साकळाई योजनेचा देखील पाठपुरावा केला होता. परंतु मधल्या काळात सत्तांतर झाल्याने कामे ठप्प झाली होते. परंतु हाती घेतलेले काम पूर्णत्वास नेण्याचा काम केले जाईल” असे आश्वासन लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी दिले.