केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भंडारा येथील प्रचार सभेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल केला. “शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपाने फोडले नसून उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली आणि शरद पवार यांच्या मुलीवरील प्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला”, असं विधान अमित शाह यांनी केलं.