आधी मुलगा, साहेब मग लेक आता सुनेला म्हणजेच सुनेत्रा पवारांना निवडून द्या, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. त्यावर राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवारांनी मूळचे पवार आणि बाहेरून आलेले पावर असं वक्तव्य केलं होतं. या विधानावर प्रतिक्रिया देताना सुनेत्रा पवार भावुकही झाल्या होत्या. त्यावर आता शरद पवार यांनी आपल्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. साताऱ्यात ते बोलत होते.