लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा अवघ्या तीन दिवसांवर आला तरी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून धुसफूस सुरू आहे. सांगली लोकसभा मतदारसंघ शिवसेना उबाठा गटाने स्वतःकडे घेतल्यानंतरही काँग्रेसचे इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी आपला दावा सोडलेला नाही. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी सोमवारी काँग्रेस व अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, आजही जोरदार शक्तिप्रदर्शनाने त्यांचा पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे विशाल पाटील यांनी सांगितलंय.