महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेचा वाद आता अधिक पेटण्याची चिन्ह आहेत. कारण काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ते ठाम आहेत. काँग्रेस पक्ष सुरुवातीपासूनच सांगलीच्या जागेसाठी आग्रही होता. मात्र ही जागा शिवसेनेकडे (ठाकरे गट) गेली. आता एकीकडे शिवसेनेकडून चंद्रहार पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसरीकडे विशाल पाटीलही मैदानात उतरले असल्याने शिवसेनेची कोंडी होण्याची शक्यता आहे.