आपल्या बारामतीत प्रयत्न करून राज्याचा पैसा आणला, आमदार निधी आणला. मात्र केंद्राचा निधी आणण्यात आपण कमी पडलो, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे. वकिल संघटनेतर्फे (१७ एप्रिल) आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यासंदर्भात आज (१८ एप्रिल) सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्यांनी आपला कार्य अहवाल अजित पवारांना पाठवणार, असं म्हटलं आहे.