गेल्या काही दिवसांपासून सर्वत्र तापमानाचा पारा चढू लागलेला आहे. वाढत्या उन्हामुळे नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागत आहे. उन्हापासून त्रास होत असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. यावेळी “वाढतं तापमान पाहता नागरिकांनी विनाकारण घराच्या बाहेर पडू नये, तातडीचे काम असेल तर पुरेशे पाणी पिऊन डोक्यावर टोपी रुमाल बांधून घराबाहेर पडावे, कुठल्याही नागरिकाला उष्माघातासंदर्भात अस्वस्थ वाटल्यास तात्काळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावे” असे आवाहन जळगाव उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर सुरेश पाटील यांनी केले आहे.