राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी पार पडेल. मात्र महायुतीच्या काही जागांवर अद्याप उमेदवार घोषित होणं बाकी आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार आणि शिंदे हे दोन्ही गट भाजपासोबत सत्तेत आहेत. महायुतीच्या जागावाटप फॅार्म्युलावरून बरीच चर्चा रंगली होती. दरम्यान, दिल्लीतही अनेक भेटीगाठी घेण्यात आल्या होत्या. मात्र या सगळ्या परिस्थितीत महायुतीचं जागावाटप पाहता त्यात भाजपाचाच वरचष्मा राहिलेला दिसतो.