शिवसेनेत फूट पडल्यानंतर एक गट महाविकास आघाडीत तर दुसरा महायुतीत सहभागी झाला आहे. महाविकास आघाडीने ४८ जागांवरही आपले उमेदवार जाहीर केले आहेत. तर महायुतीत अजूनही काही जागांवरील उमेदवारांची घोषणा होणं बाकी आहे. एकीकडे शिवसेनेनं (ठाकरे गट) मविआच्या वाटाघाटीत आपला दबदबा कायम ठेवल्याचं दिसलं. तर दुसरीकडे महायुतीत मात्र शिवसेनेला (शिंदे गट) थोडी तडजोड करावी लागली. दोन्ही शिवसेनेच्या याच भूमिकेवर घेतलेला हा आढावा…