लोकसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रातील विदर्भात मतदान सुरू आहे. नागपूरचे महायुतीचे
उमेदवार तथा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यंदा नागपूरमध्ये ७५ टक्क्यांपर्यंत मतदान व्हावा असा प्रयत्न केला आहे. तर आपण रेकाॅर्ड ब्रेक मार्जिनने विजयी होऊ, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.