Lok Sabha Election 2024: सुप्रिया सुळे यांनी बारामतीमधील कन्हेरी मारुती मंदिरात आज प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार उपस्थित होते. त्याचबरोबर युगेंद्र पवार, रोहित पवार, सुनंदा पवार, राजेंद्र पवार देखील उपस्थितीत होते. यावेळी सुप्रिया सुळेंसाठी पवार कुटुंब एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान, सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. त्यामुळे बारामतीच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
Supriya Sule broke a campaign coconut at Kanheri Maruti temple in Baramati today. NCP (Sharad Chandra Pawar) party president Sharad Pawar was present on this occasion. Along with this, Yugendra Pawar, Rohit Pawar, Sunanda Pawar, Rajendra Pawar were also present. On this occasion, we saw a picture of the Pawar family coming together for Supriya Sule. Meanwhile, Deputy Chief Minister Ajit Pawar’s wife Sunetra Pawar is in the fray against Supriya Sule.