परभणीतील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उपस्थितीती लावली होती. यावेळी मोदींनी महादेव जानकर माझा लहान भाऊ असं म्हणत त्यांना संसदेत पाठवा आहे, असं आवाहन जनतेला केलं. तसंच जानकरांच्या हातात त्यांनी शिट्टी देखील दिली. तेव्हा जानकर यांनी उत्साह आणि आनंदाच्या भरात जोरजोरात शिट्टी वाजवली.