यवतमाळ-वाशिम लोकसभा महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील (महल्ले) यांच्या प्रचारार्थ राळेगाव, यवतमाळ येथे रविवारी (२१ एप्रिल) जाहीर सभा पार पडली. यावेळी उमुमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. मूळ पवार आणि बाहेरचे पवार असं विधान बारामतीत शरद पवार यांनी केलं होतं. त्यावरून देवेंद्र फडणवीसांनी खोचक टोला लगावला.