अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा आणि प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्यात सभा घेण्याच्या मैदानावरुन वाद सुरू झाला आहे. २३ आणि २४ एप्रिलला अमरावतीच्या सायन्स कोर मैदानावर सभा घेण्यासाठी परवानगी मिळाली होती. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे नवनीत राणा यांच्यासाठी सभा घेणार असल्यामुळे बच्चू कडू यांना मिळालेली परवानगी रद्द करण्यात आल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला यावर रवी राणा यांनीही उत्तर दिलं आहे.