लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. सर्वच पक्ष शक्तीप्रदर्शन करून प्रचारसभा गाजवत आहेत. मात्र यंदाची ही निवडणूक थोडी वेगळी ठरणार आहे. कारण यंदा दुभंगलेले शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन्ही गटही आमने सामने आहेत. काँग्रेस, भाजपनेही पूर्ण ताकद पणाला लावली आहे. इतर पक्षही प्रचारात मागे नाहीत. अशावेळी केवळ उमेदवारालाच नाही तर संबंधित पक्षाच्या प्रमुखांना स्वतःचं राजकीय अस्तित्वही सिद्ध करावं लागणार आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे सविस्तर विश्लेषण…