विदर्भातील पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्व विदर्भात १९ एप्रिलला पार पडलं तर दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भात २६ एप्रिलला मतदान होत आहे. एकीकडे अमरावतीमध्ये महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी सभा घेतली तर महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यासाठी राहुल गांधींनी सभा घेतली आहे. दुसरीकडे अकोल्यामध्ये ‘वंचित’चे प्रकाश आंबेडकर, महायुतीचे अनुप धोत्रे आणि काँग्रेसकडून डॉ. अभय पाटील रिंगणात आहेत. अमरावती आणि अकोल्याची जनता कोणाच्या बाजूने कौल देईल? या संदर्भात ‘लोकसत्ता’ नागपूर आवृत्तीचे निवासी संपादक देवेंद्र गावंडे यांनी केलेलं हे विश्लेषण…