छगन भुजबळ हे शरद पवार गटात येण्यासाठी इच्छूक असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. त्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेतून माघार घेतल्याबद्दलही जयंत पाटील यांनी खेद व्यक्त केला आहे. पुण्यात ते प्रसार माध्यमांशी बोलत होते