मराठा समाजामुळे भुजबळांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली, अशी टीका मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री भुजबळांना विचारलं असता मी कोणालाच घाबरत नाही, मराठा समाज सुद्धा माझ्या सोबत असल्याचं भुजबळांनी स्पष्ट केलं. नाशिक लोकसभेच्या जागेला आधीच उशीर झाला त्यामुळे मी माघार घेतली, असं सांगत आपण घाबरून माघार घेतली नसल्याचे भुजबळांनी स्पष्ट केलं.