२०१४ मध्ये जे केलं ते संस्कार आणि दादांनी जे केलं ती मात्र गद्दारी? असा प्रश्न उपस्थित करत बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर थेट हल्लाबोल चढवला आहे. यावेळी धनंजय मुंडेंनी २०१७ साली दिल्लीत झालेल्या एका बैठकीचाही उल्लेख केला. त्याचे व्हिडीओ फुटेजही आपल्याकडे आहेत, असा सूचक इशाराही त्यांनी दिला.