विधानसभेला मराठ्यांचा वेगळा पक्ष स्थापन होणार का? असा प्रश्न पत्रकारांनी मनोज जरांगे पाटील यांना विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मराठ्यांच्या पोरांनी एक महिन्याआधीच विधानसभेची तयारी सुरू केली आहे. सगे-सोयऱ्याची अंमलबजावणी केली तर राजकारणात आम्ही जाणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. विदर्भात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर आज जालन्यात मतदानानंतर मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला.