पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज ते डेक्कन येथील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रेच आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, उद्योग मंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, आमदार भीमराव तापकीर यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.ही पदयात्रा शहराच्या मुख्य रस्त्यावरुन आयोजित केल्याने नागरिकांना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जाव लागल.तर दुसर्या बाजूला काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्ती देखील पदयात्रेत सहभागी झाले होते,अशी माहिती समोर येत आहे. त्यावर महायुतीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.